बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : भाजपला यंदा कर्नाटकात पराभव पत्करावा लागेल, असा अंदाज पहिल्या जनमत चाचणीतून समोर आला आहे. एबीपी न्यूज-सी व्होटरने केलेल्या जनमत चाचणीत कर्नाटकमधील निवडणुकीच्या निकालाबाबत धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव होणार असून, काँग्रेस विजयी होईल, असे चाचणीचा निष्कर्ष सांगतो. याआधीच्या गोपनीय चाचण्यांमधूनही असेच संकेत मिळाले होते. (karnataka assembly election 2023)
चाचणीतील आकडेवारीनुसार, ग्रेटर बंगळूर क्षेत्रात ३२ जागांपैकी भाजपला ११ ते १५, काँग्रेसला १५ ते १९ आणि निजदला १ ते ३ जागा मिळतील; तर ओल्ड म्हैसूरमधील ५५ जागांपैकी भाजपला १ ते ३, काँग्रेसला २४ ते
एबीपी न्यूज-सी व्होटर जनमत चाचणीनुसार, कर्नाटकमध्ये एकूण २२४ जागांपैकी काँग्रेसला ११५ ते १२७ जागा मिळतील; तर भाजपला ६८ ते ८० आणि निजदला २३ ते ३५ जागा आणि इतरांना ० ते २ जागा मिळतील, असे म्हटले आहे.
बंगळूर क्षेत्रात ३२ जागांपैकी भाजपला ११ ते १५, काँग्रेसला १५ ते १९ आणि निजदला १ ते ३ जागा मिळतील; तर ओल्ड म्हैसूरमधील ५५ २८ आणि निजदला २६ ते २७ जागा मिळतील. मध्य कर्नाटकमध्ये ३५ जागांपैकी भाजपला १२ ते १६, काँग्रेसला १८ ते २२, निजदला १ ते २ आणि इतरांना ० ते १ जागा मिळेल; तर भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या किनारपट्टी भागात भाजपला ९ ते १३, काँग्रेसला ८ ते १२, निजदला १ आणि इतरांना ते ११ जागा मिळतील, असा अंदाज आहे. हैदराबाद-कर्नाटकात भाजपला ८ ते १२, काँग्रेसला १९ ते २३, निजदला ० ते १ आणि इतरांना ० ते १ जागा मिळण्याची शक्यता आहे.