कर्नाटकात त्रिशंकू विधानसभा; काँग्रेस ठरणार सर्वात मोठा पक्ष

कर्नाटकात त्रिशंकू विधानसभा; काँग्रेस ठरणार सर्वात मोठा पक्ष

बंगळूर; वृत्तसंस्था :  कर्नाटकातील 224 जागांसाठी बुधवारी मतदान करण्यात आले. त्यानंतर समोर आलेल्या पाच एक्झिट पोलनुसार त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता असून, काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर, धर्मनिरपेक्ष जनता दल म्हणजेच निजद किंगमेकर ठरण्याचे संकेत मिळाले आहेत. भाजप दुसर्‍या क्रमांकावर आणि निजद तिसर्‍या क्रमांकावर आहे. मात्र, 'आज तक'ने काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल, असे म्हटले आहे.

काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्याचे दिसत असले, तरी त्यांना बहुमतासाठी काही जागा कमी आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी 113 आमदारांची गरज आहे. 13 मे रोजी कर्नाटक विधानसभेचे निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान, 'सी व्होटर' आणि अन्य संस्थांनी केलेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणात काँग्रेसला 110 ते 122 जागा, भाजपला 73 ते 85 आणि निजदला 21 ते 29 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news