गुवाहाटी, वृत्तसंस्था : नागरिकत्व कायदा 1955 च्या कलम 6 अ च्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी आसाम हा म्यानमारचा भाग असल्याचा दावा केला होता. त्याला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी तीव्र आक्षेप घेतला.
सरमा यांनी याबाबत पत्रकार परिषद बोलावून सांगितले की, सिब्बल यांना इतिहासाचे ज्ञान नाही. आसाम हा प्राचीन काळापासून भारताचा अविभाज्य घटक आहे. त्याची इत्थंभूत माहिती उपलब्ध आहे. हे राज्य कधीही म्यानमारचा भाग नव्हते. तसा कुठलाही डेटा नाही.
आसामच्या आमदारांनी कपिल सिब्बल यांच्यावर टीका केली. आसाममधील आमदार पीयूष हजारिका यांनी सोशल मीडियावरून आसाम हा महाभारत काळातही भारताचा भाग होता. आजही आहे, पुढेही राहील, असे स्पष्ट केले आहे.