कपिल शर्मा दिसणार डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत, आगामी सिनेमाचे पोस्टर व्हायरल

कपिल शर्मा
कपिल शर्मा

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉमेडियन कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. किस किस को प्यार करू, फिरंगी या चित्रपटानंतर कपिल शर्मा आता ज्विगाटो या त्याच्या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळेस कपिल शर्मा एका डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. कपिलच्या नव्या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

सिनेमाचे पोस्टर शेअर करत दिली माहिती

कपिल शर्माने ज्विगाटो या त्याच्या आगामी सिनेमाचे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये कपिल एका डिलिव्हर बॉयच्या भूमिकेत दिसत आहे. या सिनेमात कपिल शर्मा बरोबर शहाना गोस्वामी ने अभिनय केला आहे. कपिल शर्माचे चाहते त्याला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. कपिल शर्माने २०१५ साली किस किस को प्यार करू या सिनेमापासून आपल्या करियरची सुरूवात केली होती. तर यानंतर २०१७ साली त्याचा फिरंगी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

सिनेमाबाबत कपिल शर्मा उत्सुक

कपिल शिवाय TIFF ने ट्विटर अकाऊंटवर सिनेमाचा प्रोमो शेअर केला आहे. १ मिनीट ५३ सेकंदाच्या या प्रोमोमध्ये कपिल फारच गंभीर दिसत आहे. कपिल या सिनेमात एका रूढीवादी पुरूषाच्या भूमिकेत आहे. जो आपल्या पत्नीला जॉब करण्यासाठी परवानगी देत नाही. कपिलच्या या सिनेमाचा व्हिडिओ सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. कपिल शर्माचे चाहते त्याला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news