Kapil Dev’s Message : कपिल देव यांचा अर्जुन तेंडुलकरला सल्‍ला, म्‍हणाले, “तुझी कामगिरी तुझ्‍या वडिलांच्‍या ५० टक्‍के…”

Kapil Dev’s Message : कपिल देव यांचा अर्जुन तेंडुलकरला सल्‍ला, म्‍हणाले, “तुझी कामगिरी तुझ्‍या वडिलांच्‍या ५० टक्‍के…”
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यंदाच्‍या आयपीएल स्‍पर्धेत न खेळता एका खेळाडुची चर्चा झाली, तो म्‍हणजे भारतीय क्रिकेटचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर. २२ वर्षीय अर्जुनवर मुंबई इंडियन संघाने ३० लाख रुपयांची बोली लावली होती. तो यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये मैदानात उतरणार, अशी शक्‍यताही वर्तवली जात होती. मात्र त्‍याला यंदा संधी मिळालीच नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज असणारा अर्जुनला यंदा संधी मिळाली नसल्‍याने सचिनचे फॅन हिरमुसले आहेत. आता भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी अर्जुन तेंडुलकरला एका मुलाखतीत खास मसेज दिला आहे. ( Kapil Dev's Message )

कपिल देव यांनी मुलाखतीत अर्जुन संदर्भात बोलताना म्‍हटलं की, क्रिकेटमध्‍ये तेंडुलकर हे आडनाव असणं याचे काही फायदे आहेत. तसेच काही तोटेही आहेत. सचिन आणि अर्जुन यांची तुलना करणार्‍यांनी लक्षात घ्‍यावे की अर्जुन हा खूपच तरुण आहे. तुम्‍ही याच्‍याबद्‍दल का चर्चा करता. तर तो सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. त्‍याला त्‍याचा नैसर्गिक खेळ खेळु द्‍या. त्‍याला आधी खेळू तरी द्‍या यानंतर त्‍याची सचिनबरोबर तुलना करा.

मला क्रिकेटचे महान खेळाडू डॉन ब्रॅडमन यांची गोष्‍ट सांगावी वाटते. डॉन ब्रॅडमन यांचा क्रिकेटमध्‍ये प्रचंड दबदबा होता. त्‍यांचा मुलगाही क्रिकेट खेळायचा;पण त्‍याची ब्रॅडमन यांच्‍याबरोबर तुलना झाली. त्‍याच्‍यावर प्रचंड दबाव आला. त्‍याने त्‍याच्‍या नावातील ब्रॅडमन हा शब्‍दच काढून टाकला. कारण त्‍याची तुलना वडिलांच्‍या खेळाबरोबर होत होती, असेही कपिल यावेळी
म्‍हणाले.

Kapil Dev's Message : तू सध्‍या तरी क्रिकेट खेळाचा आनंद लूटावास

यावेळी कपिल म्‍हणाले की, मी अर्जुन तेंडुलकर याला एकच सल्‍ला देईन की, " तु जरी तुझ्‍या वडिलांनी केलेल्‍या कामगिरी ५० टक्‍के कामगिरी केली तरी ती तुलना करण्‍यासाठी कमीच असणार आहे. कारण क्रिकेटमध्‍ये तेंडुलकर हे नाव आलं की, आमच्‍या सर्वांचाच अपेक्षा वाढणे साहजिकच आहे. सचिन तेंडुलकर हा क्रिकेटमधील महान खेळाडू होता. त्‍यामुळे तुला एवढेच सांगेन की, तु सध्‍या तरी फक्‍त क्रिकेट खेळाचा मनमुदार आनंद लूटावास".

काही दिवसांपूर्वीच अर्जुनबाबत बोलताना सचिन म्‍हणाला होता की, मी काय विचार करतो, मला काय वाटते हे महत्त्‍वाचे नाही. त्‍याला क्रिकेट खेळाची आवड आहे. कारण आयपीएलचे यंदाचे सीजन पूर्ण झालं आहे. तो सातत्‍याने सराव करत आहे. अर्जुनसमोर निश्‍चितच मोठे आव्‍हान आहे. मात्र त्‍याने कठोर मेहनत घेणे गरजेचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news