‘समुद्रार्पण’ होत आहे ‘हे’ विमानतळ

‘समुद्रार्पण’ होत आहे ‘हे’ विमानतळ
Published on
Updated on

टोकियो : जपानमध्ये समुद्राच्या मधोमध विमानतळ तयार करण्याचे अफलातून स्थापत्यकौशल्य दाखवण्यात आले होते. हे विमानतळ तयार करण्यासाठी सात वर्षांपेक्षा जास्त काळ लागला. या विमानतळासाठी 20 अब्ज डॉलर्स खर्च झाला होता. आता मात्र, जवळपास 30 वर्षांनंतर समुद्र हळूहळू हे विमानतळ काढून घेत आहे. दरवर्षी हे विमानतळ समुद्रात बुडत आहे.

जपानच्या या विमानतळाचे नाव 'कानसाई आंतरराष्ट्रीय विमानतळ' आहे. हे विमानतळ 1994 पासून वाहतुकीसाठी सुरू केले होते. हे ओसाका आणि जपानच्या इतर जवळच्या शहरांमध्ये उपयुक्त आहे. आता हे विमानतळ सातत्याने बुडत आहे. 2018 च्या अभ्यासानुसार हे विमानतळ आतापर्यंत सुमारे 40 फूट बुडाले आहे. 2056 पर्यंत हे विमानतळ आणखी 13 फूट बुडण्याची शक्यता आहे. त्यानंतर समुद्राचे पाणी येथे पृष्ठभागावर येईल. या विमानतळाचे बांधकाम 1987 मध्ये सुरू झाले आणि पूर्ण होण्यासाठी 7 वर्षे लागली. आजही ते दरवर्षी 2.5 कोटी प्रवाशांना सेवा देते. ते तयार करण्यासाठी 1.66 लाख कोटी रुपये खर्च आला होता. त्याची धावपट्टी 4,000 मीटरपेक्षा जास्त लांब आहे, ज्यामुळे ते जगातील सर्वात लांब आणि सर्वात मोठे विमानतळ बनले आहे.

मुख्य शहरापासून दूर असलेल्या या विमानतळाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते 24 तास सुरू ठेवता येते. हे जपानमधील ओसाका, क्योटो आणि कोबे सारख्या मोठ्या शहरांना जगाशी जोडते. हे ऑल निप्पॉन एअरवेज, जपान एअरलाईन्स आणि निप्पॉन कार्गो एअरलाईन्ससाठी बेस स्टेशन म्हणूनदेखील काम करते. जेव्हा ओसाकाच्या जुन्या विमानतळावर प्रचंड गर्दी होऊ लागली, त्यावेळी हे विमानतळ बांधण्याची कल्पना समोर आली. हे विमानतळ बांधण्यासाठी समुद्रात सी बेड तयार करण्यात आला होता. एवढेच नाही तर या विमानतळाला समुद्रात बुडण्यापासून वाचवण्यासाठी त्याभोवती समुद्र संरक्षण भिंत बांधण्यात आली. आता विमानतळाचे वजन आणि त्यावर बांधण्यात आलेल्या टर्मिनल इमारतीमुळे हा सागरी तळ बुडत असल्याने विमानतळ बुडत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news