Kacha Badam : पॅरिसपर्यंत पोहचला ‘कच्चा बादाम’, युवकांचा भन्नाट डान्स व्हायरल

Kacha Badam : पॅरिसपर्यंत पोहचला ‘कच्चा बादाम’, युवकांचा भन्नाट डान्स व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क 

पश्चिम बंगालमधील कच्चा बादाम (Kacha Badam Trend) गाणे पॅरिसपर्यंत पोहचले आहे. पॅरिसच्या युवकांचा या गाण्यावरील डान्स बघून इंटरनेट यूजर्सही अवाक झाले. कच्चा बादाम गाण्यावर देशात तसेच परदेशी नागरिकांमध्ये भलतीच क्रेझ पाहायला मिळत आहे. पॅरिसमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तीन तरुण या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत, हा त्यांचा डान्स अनेक नेटिझन्सची मने जिंकत आहेत. त्याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कच्चा बादाम (Kacha Badam) हे लोकप्रिय गाणे गाणारा गायक भुबन पश्चिम बंगालमध्ये शेंगदाणे विकण्याचे काम करत होता. शेंगदाणे विकत असताना ते कच्चा बादाम गाणे गायचा. हे गाणे सोशल मीडियावर इतके व्हायरल झाले. त्यानंतर भुबन मीडियावर प्रसिध्दी झोतात आला. या गाण्याने सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांना यावर थिरकायला लावले. पॅरिसमधील या मुलाच्या डान्सने, भारतीय यूजर्सही वेडे झाले आहेत. सोशल मीडियावरील पॅरिसच्या या युवकांचे भारतातील नागरिकांडूनही कौतुक केले जात आहे.

'कच्चा बदाम' फेम कोण आहे?

'कच्चा बदाम' (Kacha Badam Trend) हे गाणे कोणत्याही प्रसिद्ध गायकाने गायलेले नसून हातगाडीवर शेंगदाणे विकणाऱ्या 'भुबन बड्याकर'ने गायले आहे. भुबन बड्याकर' हा पश्चिम बंगालमधील बीरभूमचा रहिवासी आहे. त्यांचे हे गाणे इतके व्हायरल झाले की, भुबन रातोरात लोकप्रिय झाले. आता तो सेलिब्रिटी झाली आहे. प्रत्येकजण त्याच्या गाण्यावर रील बनवत आहे आणि ते सोशल मीडीयावर शेअर करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jika (@jikamanu)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news