सांगली: मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घेतली रघुनाथ पाटील यांची भेट

सांगली: मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घेतली रघुनाथ पाटील यांची भेट

इस्लामपूर: पुढारी वृत्तसेवा: तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री व बीआरएस पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव आज (दि.१) वाळवा तालुक्याच्या दौऱ्यावर आले आहेत. वाटेगाव (ता. वाळवा) येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर ते शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांच्या साखराळे येथील निवासस्थानी भोजनासाठी थांबले. त्यामुळे रघुनाथ पाटील बीआरएसच्या वाटे‍वर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे दोन वाजता तालुक्यात आगमन झाले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभि‍वादन करुन त्यांनी स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती लावली. त्यानंतर त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या नाते‍वाईकांचीही भेट घेतली. सव्वा चार वाजता ते साखराळे येथे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झाले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news