पुण्याच्या वाहतूक कोंडीला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया वैतागले…

पुण्याच्या वाहतूक कोंडीला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया वैतागले…

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कात्रजवरून मी विमानतळापर्यंत आलो, पुण्याची वाहतूक कोंडीचा मला चांगलाच अनुभव आला. पुण्यात वाहतूक कोंडी नुसतीच खचाखच भरलेली आहे, असे वक्तव्य केंद्रीय नागर हवाई मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी केले.

पुणे विमानतळावरील 'एरोमॉल पार्कींग'च्या उदघाटनासाठी ज्योतिरादित्य सिंधिया शुक्रवारी सायंकाळी पुणे विमानतळावर आले. तेव्हा त्यांनी त्यांच्या भाषणात पुण्याच्या वाढत्या वाहतूकीच्या प्रश्नावर लक्ष वेधले. त्यांच्या मते पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यावरच ठिकठिकाणी अनधिकृत पार्कींग वाहनचालकांकडून केले जात आहे. परिणामी, वाहतूक कोंडीच्या समस्या वाढत आहेत. शहरातील पार्कींगच्या समस्या सोडवून वाहतूक कोंडी सोडवायची असेल तर बहुमजली पार्कींग हा एक पर्याय असू शकतो, असे त्यांनी यावेळी सुचविले.

सिंधिया एरोमॉल पार्कींगच्या उदघाटनासाठच्या पूर्वी म्हणजेच गुरूवारी दिवसभर कोल्हापूर दौर्‍यावर होते. पुण्यात येताना ज्योतिरादित्य सिंधीया यांना कात्रज पासून लोहगाव विमानतळ येथे येईपर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. या वाहतूक कोंडीमुळे वैतागलेल्या सिंधीया यांनी आपल्या भाषणात शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर लक्ष वेधले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news