चंद्रपूर : सारस पक्षांचा ‘जुनोना’ अधिवास संकटात; जलपर्णीमुळे फिरवली पाठ

सारस पक्षी
सारस पक्षी
Published on
Updated on

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा, चंद्रपूर शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेला जुनोना तलावातील सारस पक्षांचा अधिवास संकटात सापडला आहे. तलावात निर्माण झालेल्या जलपर्णी वनस्पतीमुळे दरवर्षी या ठिकाणी स्थलांतरीत होणाऱ्या पाहुण्यांनी या तलावाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे प्राचीन, गोंडकालीन नैसर्गिक जुनोना तलावाच्या संवर्धनाकरिता इको प्रो या पर्यावरण संस्थेने कंबर कसली असून, वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना साकडे घातले आहे.

चंद्रपूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर निसर्गरम्य, प्राचीन गोंडकालीन 'जुनोना तलाव' आहे. चंद्रपूरमधील या एकमेव तलावात सारस पक्षांचा अधिवास आहे. तसेच दरवर्षी या ठिकाणी या स्थलांतरित पाहुण्यांचे आगमण होते. त्यामुळेच पर्यटनाच्या दृष्टीने जुनोना तलावाला महत्व आहे. मात्र, या तलावाची सध्या दुरावस्था झाली असून, तलावात परावलंबी जलपर्णी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. जलपर्णी वनस्पतीमुळे तलावाचे नैसर्गिक सौंदर्यच बिघडले आहे.

या तलावातील जलचरांवर याचा विपरित परिणाम झाला आहे. मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. यामुळे रोजगाराची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सारस पक्षाचे अधिवास असलेल्या जुनोना तलावाच्या संवर्धनाकरिता इको प्रो या पर्यावरणवादी संस्थेने पुढाकार घेतला आहे. जागतिक मत्सव्यवसाय दिनाचे औचित्य साधून राज्याचे वन व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना साकडे घातले आहे. इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, नितिन रामटेके व अन्य सदस्यांनी निवेदन देऊन तलावाचे नैसर्गिक रूप कसे धोक्यात आले आहे, व ते वाचविणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

स्थलांतरित पाहुण्यांनी पाठ फिरविली

चंद्रपूर शहरापासून जवळच असलेल्‍या जुनोना तलावाभोवती घनदाट जंगल आहे. नैसर्गिक सौंदर्याने तलाव नटलेला आहे. त्यामुळे अनेक वर्षापासूनचे त्याचे सौंदर्य अबाधित आहे. परंतु तलावात दरवर्षी होणारी स्थलांतरित पाहुण्यांची गर्दी यावेळी पाहायला मिळत नाही. तलावात वाढलेल्‍या जलपर्णीमुळे तलावातील जैवविविधता, पक्षी अधिवास संकटात सापडला आहे.

जूनोना तलाव होता सारस पक्षाचा अधिवास

चंद्रपूर जिल्ह्यात एकमेव जुनोना तलाव हा सारस पक्षाचा अधिवास आहे. परंतु तोही संकटात सापडला आहे. उच्च न्यायालयाच्या 'सारस पक्षी संवर्धन' जनहित याचिकेवरील आदेशानुसार जिल्ह्यातील शेवटचे 'सारस' पक्षी अधिवास असलेल्या जूनोना तलावाचे संवर्धन करावयाचे आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने तलावाच्या संवर्धनाचा आराखडा तयार करण्यात आला, परंतू खर्चास अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

ऐतिहासिक गोंड़कालीन जूनोना तलाव

गोंडराणी हितारानी आणि गोंडराजे खांडक्या बल्लाळशहा यांनी जुनोना तलावाचे बांधकाम करून त्या ठिकाणी 'जलमहल' बांधकाम केले. त्यामुळे जुनोना तलावाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. दरवर्षी चंद्रपूर शहर व परिसरातील युवक, विद्यार्थी या ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता करून ऐतिहासिक व नैसर्गिक वारशाचे जतन करीत आहेत.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news