Junaid Khan : आमिर खानचा लाडला जुनैद खान अभिनयात, ‘या’ केसवर येतोय चित्रपट

junaid aamir khan
junaid aamir khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेटफ्लिक्सच्या ऑनलाईन कार्यक्रमात नव्या प्रोजेक्टची घोषणा करण्यात आलीय. या यादीत सुपरस्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खान या नव्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. (Junaid Khan ) चित्रपटाचे नाव आहे- 'महाराज'. इतिहासात 'महाराज लायबल केस' (महाराज मानहानी केस) नावाने एक प्रकरण चर्चित होते. रिपोर्ट्सनुसार, या केसवर आधारित दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्रा नेटफ्लिक्स चित्रपट 'महाराज'मधून या केसची कहाणी घेऊन येत आहेत. (Junaid Khan )

नेटफ्लिक्स इंडियाने सोशल मीडियावर जो फोटो शेअर केला आहे, ते एका वृत्तपत्राचे पहिले पान दिसत आहे. यामध्ये तारीख लिहिलीय-१८६३ आणि मध्ये लिहिलंय-'सुप्रीम कोर्ट ऑफ बॉम्बे' (नंतरचे बॉम्बे हायकोर्ट). या दोन्ही गोष्टी 'महाराज लायबल केस' कडे इशारा करतात. रिपोर्ट्सनुसार, 'महाराज' मध्ये जुनैद पत्रकाराच्या भूमिका करत आहे. या कथेचे कनेक्शन पत्रकार करसनदास मुलजीवर आधारित आहे.

१८३२ मध्ये जन्मलेले करसनदास मुलजी केवळ एक पत्रकारचं नव्हते तर समाज सुधारक देखील होते. त्यांनी महाविद्यालयीन काळात दादाभाई नौरोजी यांच्या 'रास्त गोफ्तार' वृत्तपत्रासाठी लिहिणे सुरू केले होते. एका स्पर्धेसाठी त्यांनी विधवा पुनर्विवाहवर लेख लिहिला होता, तेव्हा त्यांना घरातून बाहेर काढण्यात आले होते. नंतर करसनदास यांनी १८५५ मध्ये स्वत:चे वृत्तपत्र 'सत्यप्रकाश' काढले. यातून समाजातील आनेक कुप्रथेबद्दल लिहिले, अनेक गंभीर खुलासे केले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news