Joint operation: भारतीय तटरक्षक दल, NCB आणि गुजरात ATS ची संयुक्त कारवाई; ड्रग्जसह १४ पाकिस्तानींना अटक

Joint operation
Joint operation

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय तटरक्षक दल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि गुजरात एटीएसने गुजरात किनाऱ्याजवळ मोठी कारवाई केली आहे. या यंत्रणांनी गुजरात किनारपट्टीजवळील आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळ सुमारे ८६ किलो ड्रग्जसह १४ पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून गुप्तचर माहितीच्या आधारे एजन्सीकडून ही कारवाई करण्यात येत होती, या संदर्भातील माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. (Joint operation)

भारतीय तटरक्षक दलाने आज (दि.२८) ६०० कोटी किमतीचे सुमारे ८६ किलो ड्रग्ज असलेली एक संशयास्पद पाकिस्तानी बोट ताब्यात घेतली. गुप्तचरांसह, या प्रदेशात कार्यरत असलेल्या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटवरही या तिन्ही संयुक्त दलांनी कारवाई केली. ड्रग्जसह पाकिस्तानी जहाजातील १४ क्रू मेंबर्सनाही ताब्यात घेण्यात आले.

ऑपरेशनची कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी एजन्सीने समवर्ती मोहिमांवर जहाजे आणि विमाने तैनात केली. या कारवाईत सामील असलेल्या प्रमुख जहाजांपैकी एक म्हणजे तटरक्षक दलाचे जहाज राजरतन, ज्यामध्ये NCB आणि ATS या दोन्ही विभागांचे अधिकारी होते, असेही अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news