Vedaa Teaser : ‘सिर्फ जंग लडनी आती है’, ॲक्शनने भरपूर जॉन अब्राहमचा ‘वेदा’ चित्रपट

Vedaa Teaser
Vedaa Teaser

पुढारी ऑनलाईन डेस्क : जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ यांचा चित्रपट 'वेदा' चा दमदार टीजर रिलीज झाला आहे. टीजरमध्ये जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ फुल ऑन ॲक्शन अवतारात दिसणार आहे. टीजरमध्ये शर्वरी वाघला सिस्टीम विरोधात आवाज उठवताना पाहू शकतो. जॉन अब्राहम तिचा संरक्षक बनून सोबत लढाई लढताना दिसतील. दोन्ही स्टार्सचा सामना विलेनची भूमिका साकारलेले अभिषेक बॅनर्जीशी होणार आहे.

'वेदा'चे टीजरची सुरुवात शर्वरी वाघची ॲक्शन लोडेड अवताराने होते. जी आपल्या हक्काची लडाई लढण्यासाठी त्यासाठी ती धडपडताना दिसत आहे. यानंतर जॉन अब्राहमची एन्ट्री होते. तो म्हणताना दिसतो- मला भांडायला येत नाही, केवळ युद्ध करायला येतं. यानंतर जेव्हा त्याचे शत्रू त्याला ओळख विचारतात तर तो स्वत:ला म्हणवतो.

'वेदा'च्या टीजरमध्ये तमन्ना भाटियाची झलक पाहायला मिळत आहे. चित्रपटामध्ये तमन्ना आणि जॉनची केमिस्ट्री पाहायला मिळू शकते.
१२ जुलै रोजी रिलीज होणार 'वेदा'

जी स्टुडिओच्या प्रोडक्शनचा चित्रपट 'वेदा'चे निखिल आडवाणीने दिग्दर्शन केले आहे. चित्रपटामध्ये जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय अभिषेक बॅनर्जी आणि तमन्ना भाटिया देखील या चित्रपटाचा भाग अशणार आहेत. १२ जुलै रोजी चित्रपटगृहात वेदा रिलीज होईल.

दिड वर्षांनंतर वापसी

'वेदा'च्या माध्यमातून जॉन अब्राहम दिड वर्षानंतर मोठ्या पडद्यावर वापसी करणार आहेत. जॉन शाहरुख खान सोबत 'पठान' चित्रपटात दिसला होता. जॉन हा खलनायकाच्या भूमिकेत होता, हा चित्रपट हिट ठरला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news