जेएनयू भारतातील सर्वोच्च मानांकित विद्यापीठ

जेएनयू भारतातील सर्वोच्च मानांकित विद्यापीठ
Published on
Updated on

लंडन; वृत्तसंस्था : दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला (जेएनयू) देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. लंडनमधील क्यूएस अर्थात क्वॉकेरेली सायमंडस अर्थात क्यूएस या उच्च शिक्षण विश्लेषण फर्मने सदर मानांकन जाहीर केले आहे. या ताज्या क्रमवारीनुसार जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला भारतीय विद्यापीठांमध्ये सर्वोच्च स्थान मिळाले आहे. क्यूएसने प्रसिद्ध केलेल्या ताज्या क्रमवारीत आणखी काही भारतीय विद्यापीठांना स्थान मिळाले असून डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये जेएनयू जगात 20 व्या क्रमांकावर असल्याचे या मानांकनात नमूद केले गेले आहे.

भूगोल, इतिहास, आधुनिक भाषा, राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध, मानववंशशास्त्र, इंग्रजी भाषा आणि साहित्य आणि भाषाशास्त्र या विषयांमध्ये विद्यापीठाला देशातील सर्वोत्तम संस्थांमध्ये स्थान देण्यात आले असल्याचे क्यूएसने याप्रसंगी म्हटले आहे. बुधवारी उशिरा ही मानांकन यादी जाहीर करण्यात आली.

क्यूएसने जाहीर केलेल्या या मानांकनानुसार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (अहमदाबाद) ही व्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासात जगातील 25 संस्थांमध्ये तर आयआयएम बंगळूर, आयआयएम-कोलकाता या पहिल्या 50 संस्थांमध्ये समाविष्ट आहेत. क्यूएस फर्मचे सीईओ जेसिका टर्नर यांनी भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण असल्याचे यावेळी म्हटले आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारणे, उच्च शिक्षणापर्यंत पोहोचणे, विद्यापीठांची डिजिटल तयारी आणि जागतिक स्पर्धात्मकता या सर्व आघाड्यांवर अद्याप बराच वाव असल्याचे निरीक्षण त्यांनी यावेळी नोंदवले. क्यूएसचे वरिष्ठ उपाध्यक्ष बेन साऊटर यांनी सध्याची परिस्थिती पाहता भारत संशोधनात ब्रिटनला मागे टाकण्याच्या समीप पोहोचला असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले.

विषयानुसार क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये अहमदाबाद, बंगळूर आणि कोलकाता आयआयएम यांना व्यवसाय-व्यवस्थापन अभ्यासातील अव्वल 50 संस्थांमध्ये स्थान देण्यात आले आहे. यामध्ये आयआयएम अहमदाबाद अव्वल 25 मध्ये समाविष्ट आहे. चेन्नईतील सवेथा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेस दंतचिकित्सा क्षेत्रात जगात 24 व्या क्रमांकावर आहे. यादरम्यान भारतीय विद्यापीठांनी कॉम्प्युटर सायन्स, रसायनशास्त्र, जैविक विज्ञान, बिजनेस स्टडीज आणि भौतिकशास्त्र या पाच विषयांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आयआयटी दिल्लीला कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये 63 वे, रसायनशास्त्रात आयआयटी बॉम्बे 95व्या, डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आयआयटी बॉम्बे 30व्या स्थानावर, ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीला लॉ आणि डीयूच्या पर्यावरण विज्ञानात 72 वा क्रमांक मिळाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news