J&K News : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 2 दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांसह अटक 

FILE PHOTO
FILE PHOTO

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजभेरा भागात लष्कराच्या दोन दहशतवादी साथीदारांना शस्त्रास्त्रांसह अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक लाख रुपये, 12 एके 47 राऊंड आणि ग्रेनेड जप्त केले आहे. या दोघांवर बिजबेहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (J&K News)

J&K News : दोघांना अटक 

माहितीनूसार, आज (दि.२२) दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजभेरा भागात लष्कर-ए-तोयबा संघटनेच्या दोन दहशतवादी साथीदारांना शस्त्रास्त्रांसह पोलिसांनी अटक केल्याचा दावा केला आहे. एका वरिष्ठ पोलिसांनी सांगितले की, तपासणीदरम्यान दोन जणांना शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात आली आहे. मुश्ताक अहमद कटू (रा. अरवानी बिजबेहारा) आणि मुश्ताक अहमद भट (रा. शेटीपोरा बिजबेहारा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून 12 एके 47 राउंड, एक ग्रेनेड आणि 1 लाख रुपये जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.  दोघांवर बिजभेरा पोलिस ठाण्यात एफआयआर क्रमांक 150/23 दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.  तपास हाती घेण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news