J&K | बारामुल्लामध्ये लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जेरबंद, ग्रेनेड जप्त

J&K | बारामुल्लामध्ये लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जेरबंद, ग्रेनेड जप्त

पुढारी ऑनलाईन : जम्मू- काश्मीरमधील (J&K) बारामुल्ला पोलिस आणि ५२ आरआरच्या संयुक्त दलाने केलेल्या कारवाईत नागबल चंदूसा येथे एकाला अटक केली आहे. मोहम्मद अश्रफ मीर असे त्याचे नाव असून तो लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या संघटनेचा दहशतवादी आहे. त्याच्याकडून एक ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी यूए (P) अॅक्ट अॅंड आर्म्स कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नागबल चंदुसा गावात दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाली होती. यानंतर बारामुल्ला पोलीस आणि लष्कराच्या ५२ आरआरने संयुक्त शोधमोहीम सुरू केली. या दरम्यान, एका संशयित तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षा दलाने त्याला पकडले. त्याची झडती घेतला असता त्याच्याकडे एक ग्रेनेड सापडले आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news