पुढारी ऑनलाईन : काल अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसला राम राम करुन काल सत्ताधारी पक्षासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसह राष्ट्रवादीमधील अनेक मातब्बर नेते सत्ताधारी पक्षात गेल्याने राज्यात खळबळ उडाली होती. यानंतरच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी 2-3 दिवसात या नेत्यांबाबतचं चित्र स्पष्ट होईल असं सुतोवाच केलं होतं.
या धामधुमीत आता अजित पवार गटाला पहिला धक्का बसला आहे. कारण शपथविधीला हजर असणारे शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं जाहीर केलं आहे. अमोल यांनी ट्वीट करत ही बातमी जाहीर केली. अमोल कोल्हे आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, ' जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं।' हे पोस्ट केलं आहे. यासोबतच मी साहेबांसोबत हा हॅशटॅगही शेअर केला आहे.
पक्षाचे नवे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी देखील अमोल यांचे ट्वीट रीट्वीट करत "पहिला मोहरा परत..!" असं ट्वीट केलं आहे.