खूशखबर; पेट्रोल दरात तब्बल २५ रुपयांची कपात

File Photo
File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंधन दरवाढीमुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने अल्प कपात करून दिलासा दिला असताना आता विविध राज्ये आपल्या अखत्यारितील कर कपात करत आहेत. महाराष्ट्रात अद्याप सरकारने निर्णय घेतला नसला तरी विविध राज्ये करकपात करून दिलासा देत आहेत.

झारखंडमध्ये देखील हेमंत सरकारने दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असून सरकारने पेट्रोलच्या दरात तब्बल 25 रुपयांनी कपात केली आहे. सोरेन सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे. सध्या राजधानी रांचीमध्ये पेट्रोल ९८.५२ रुपये लीटर आहे. तर डिझलचे दर ९१.५६ रुपये लीटर आहे.

मुख्यमंत्री सोरेन म्हणाले, 'पेट्रोल -डिझेलच्या वाढत्या दराचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. त्यामुळे सरकारने राज्य स्तरावर पेट्रोलचे दर 25 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 26 जानेवारीपासून याची अंमलबजावणी करण्यात येण्यात येणार आहे.

सरकारने दोन वर्षाचा कालावधी पूर्ण केल्याबद्दल आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले,' सरकार विद्यार्थ्यांना स्टुडंट क्रेडिट कार्ड देणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणतीही अडचण येणाप नाही. आदिवासी विद्यार्थ्यांना बँक कर्ज देत नाही, या प्रश्नावर सरकार गंभीर आहे. विद्यार्थ्यांच्या या समस्येवर सरकार लवकरच तोडगा काढणार आहे.

केंद्र सरकारने तीन नोव्हेंबर रोजी पेट्रोल-डिझेलवर लावण्यात येणारे एक्साइज कर कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपशासित राज्यांनी राज्य सरकारच्या करात कपात करण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्यांनी दर कमी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, काही राज्यांनी दर कमी न केल्याने पेट्रोल डिझेलचे दर १०० रुपयांच्या वर आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news