मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सिद्धीविनायक मंदिरात येत्या मंगळवारी (दि.9) गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव पार पडणार आहे. नव्या मराठी वर्षाच्या मुहूर्तावर गणेशभक्तांना बाप्पाच्या दागिन्यांचा प्रसाद मिळणार आहे. (Shree Siddhivinayak Temple)
मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिर गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. दररोज भाविकांची गर्दी उसळलेली असते. मंदीरात सिद्धिविनायकाला भाविकांनी अर्पण केलेल्या दागिन्यांच्या लिलाव करण्यात येतो. श्रीगणेश प्रतिमा, लॉकेट्स, दुर्वा, मोदक, अंगठ्या, सोन्याच्या साखळ्या, हार यांचा समावेश आहे. येत्या मंगळवारी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी 9 एप्रिल रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कालावधीत मंदिराच्या सभा मंडपात हा लिलाव पार पडणार आहे. लिलावासाठी उपलब्ध असलेल्या अलंकारांपैकी काही अलंकार मंदिराच्या आवारात प्रदर्शनासाठी मांडण्यात येणार आहेत.
हेही वाचा :