जेजुरी देवसंस्थान विश्वस्त नियुक्ती प्रक्रिया निषेध, ग्रामस्थ व उघडा मारुती मित्र मंडळाच्या वतीने घंटानाद आंदोलन

जेजुरी देवसंस्थान विश्वस्त नियुक्ती प्रक्रिया निषेध, ग्रामस्थ व उघडा मारुती मित्र मंडळाच्या वतीने घंटानाद आंदोलन
Published on
Updated on

जेजुरी (पुणे): महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या श्री मार्तंड देवसंस्थान ट्रस्टच्या विश्वस्त निवडीच्या निषेधार्थ जेजुरी ग्रमस्थांच्यावतीने आंदोलन सुरू असून हे आंदोलन आता तीव्र होत चालले आहे. मंगळवार 30 मे रोजी देवसंस्थानच्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या पाचव्या दिवशी जेजुरीकर ग्रामस्थ व उघडा मारुती मित्र मंडळाच्यावतीने काळया फिती लावून घंटानाद आंदोलन करण्यात आले.

जेजुरीच्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या ट्रस्टवर सातपैकी सहा विश्वस्त बाहेर गावातील नियुक्त केल्याने ग्रामस्थांनी या नियुक्तीला विरोध करून आंदोलन सुरू केले आहे. उघडा मारुती मित्र मंडळाचे प्रमुख सचिन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी काळया फिती लावून घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. या आंदोलनाला पुरंदर तालुका मराठा महासंघ, उघडा मारुती मित्र मंडळ, जेजुरी शहर चर्मकार संघटना यांनी निवेदन देऊन पाठिंबा दिला आहे. मराठा महासंघाचे अनिकेत हरपले, विशाल बारसुडे, चर्मकार संघाचे विशाल भोसले, दिनेश डोईफोडे, राजेंद्र गायकवाड यांनी पाठिंब्याचे निवेदन दिले.

पन्नास वाहनांनी ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे

जेजुरीतील हे आंदोलन आता चिघळले असून संपूर्ण गाव यात सहभागी झाले आहे. जो पर्यंत स्थानिक विश्वस्त नियुक्त होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. जेजुरीकर नागरिकांना न्याय मिळावा, या मागणीसाठी सुमारे पन्नास वाहनातून दोनशे कार्यकर्ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news