जेजुरी देवसंस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद चिघळला; रास्ता रोकोसह मोर्चा, अर्धनग्न आंदोलन

जेजुरीच्या मुख्य चौकात रस्ता रोको करण्यात आला.
जेजुरीच्या मुख्य चौकात रस्ता रोको करण्यात आला.
Published on
Updated on

जेजुरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्त पदी ७ पैकी केवळ एकच स्थानिक विश्वस्ताची निवड करण्यात आली, उलट सहा जण बाहेरगावचे विश्वस्त नेमण्यात आले. याच्या निषेधार्थ जेजुरी ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवार( दि २६) पासून विविध आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्तांची निवड प्रक्रिया गेली सहा महिने सुरु होती. या विश्वस्त पदावर देवाची महती,देवकार्य माहिती असणाऱ्या जेजुरीतील स्थानिकांची निवड करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती . चार दिवसांपूर्वी पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नवीन विश्वस्त मंडळ जाहीर केले. यात बाहेरील गावातील सहा व केवळ एकच स्थानिक विश्वत निवडला गेला.

बाहेरील विश्वस्त नियुक्तीच्या निषेधार्थ गुरुवारी( दि २५) रोजी ग्रामस्थांची बैठक होवून यात आंदोलनाचा इशारा देण्यात आला. आज सकाळी ११ वाजता डॉ बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रथम रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यांनतर जेजुरी शहरातून मोर्चा काढण्यात आला.

जेजुरी गडाच्या पायथ्याशी निषेध व्यक्त करून घोषणा देण्यात आल्या. त्यांनतर श्री मार्तंड देवसंस्थानच्या मल्हार भक्त निवासासमोर चक्री उपोषण सुरु करण्यात आले. या आंदोलनात राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते, पालखी सोहळा समिती, आजीमाजी विश्वस्त, नगरसेवक व मोठ्या संख्यने ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news