JEE Mains : जेईईची मुख्य परीक्षा आजपासून

JEE Mains
JEE Mains

मुंबई : पुढारी वृत्तसेवा आयआयटी, एनआयटीसह इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठीची घेण्यात येत असलेल्या जेईई मुख्य सत्र १ परीक्षेला देशभरात आजपासून प्रारंभ होत असून राज्यात १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर देशभरातून तब्बल १२ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. (JEE Mains)

JEE Mains : बीआर्च व बी प्लॅनिंग पेपरसाठी अर्ज केलेल्यांसाठीच उद्या परीक्षा 

सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते ६ अशा दोन सत्रांत ही परीक्षा होईल. बीआर्च व बी प्लॅनिंग पेपरसाठी अर्ज केलेल्यांसाठीच उद्या परीक्षा घेणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) कडून ही परीक्षा आयोजित केली जाईल. परीक्षार्थीनी काळा किंवा निळा बॉल पेन आणणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना पारदर्शक पाण्याच्या बाटल्याही नेण्याची परवानगी असेल. पडताळणीसाठी उमेदवारांना मूळ ओळखपत्र, म्हणजे शाळा ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा आधार कार्ड सोबत ठेवावे, एनटीएच्या अधिकृत वेबसाइटवरून डाऊनलोड केलेल्या सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म (अंडरटेकिंग) सोबत प्रवेशपत्राची मुद्रित प्रत सोबत बाळगावी, अर्जात अपलोड फोटोप्रमाणेच पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत ठेवावा, पीडब्लूडी श्रेणीअंतर्गत विश्रांतीचा दावा करू इच्छिणाऱ्यांनी अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने जारी केलेले पीडब्लूडी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, असे सूचनांमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news