jaya bachchan : जया यांनी कंगनाला सपशेल केलं इग्नोर (Video Viral)

jaya bachchan
jaya bachchan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेते अनुपम खेर यांनी ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'उंचाई' चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. चित्रपटाच्या कलाकारांसह कुटुंबातील सदस्य आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी हे पाहण्यासाठी सहभागी झाले होते. त्यात जया बच्चन, (jaya bachchan) कंगना राणौत, अभिषेक बच्चन, सलमान खान, शहनाज गिल आणि भाग्यश्री पटवर्धन यांचाही समावेश होता. अमिताभ बच्चन स्वतःच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला उपस्थित राहू शकले नसले तरी पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक यांनी येथे आपली उपस्थिती नोंदवली. दोघेही कार्यक्रमस्थळी पोहोचले तेव्हा एक विचित्र घटना दिसली. कार्यक्रमस्थळी कंगना रणौतही मीडियासमोर उभी होती. जया बच्चन यांनी जेव्हा एंट्री घेतली तेव्हा तिने 'हॅलो जया जी' म्हणत त्यांना नमस्कार केला, मात्र जया बच्चन यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. (jaya bachchan )

जया यांनी कंगनाकडे सपशेल केले दुर्लक्ष

जया बच्चनची ही गोष्ट चाहत्यांना अजिबात आवडली नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ येताच तो व्हायरल होऊ लागला. चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. दोन गटात विभागले गेले. कुणी जया बच्चनला तर कुणी कंगनाला सपोर्ट करत होते. एका चाहत्याने तटस्थ राहून टिप्पणी केली आणि लिहिले की, ही अतिशय विचित्र परिस्थिती उद्भवली, जिथे कोणाला प्रतिक्रिया कशी द्यावी हे माहित नव्हते. दुसरीकडे, अभिषेक बच्चन कार्यक्रमस्थळी आला तेव्हा त्याने कंगना राणौतला मिठी मारली आणि तिच्याशी बोलला.

जया-कंगना यांच्यात शाब्दिक युद्ध

कंगना रणौतने जया बच्चन यांच्या 'थाली' कमेंटवर टिप्पणी करताना त्यांनी २०२० सालची गोष्ट समोर आणण्यास सुरुवात केली. त्या लोकसभेत काय म्हणाल्या होत्या. त्याचवेळी जया बच्चन यांनी सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाल्यावर कंगना राणौतवरही निशाणा साधला होता. कंगनाने बॉलिवूडला 'गटर' म्हटले होते, त्यावर जया बच्चन यांचा संताप अनावर झाला होता. बॉलीवूडची अशा प्रकारे बदनामी होताना पाहून जया म्हणाल्या होत्या की, ज्या लोकांनी इंडस्ट्रीत नाव कमावले ते आज गटर म्हणत आहेत. ते ज्या ताटात खातात त्यात छिद्र करतात. कंगनाने जया बच्चनला प्रत्युत्तर दिले आणि म्हणाली होती की, "जयाजी तुम्ही कोणत्या थाळीबद्दल बोलत आहात? प्लेट, जिथे दोन मिनिटांचा रोल उपलब्ध आहे, आयटम नंबर आणि रोमँटिक सीन्स दिले जातात. मी चित्रपटसृष्टीला स्त्रीवाद शिकवला आहे. ही थाळी देशभक्तीपर चित्रपटांनी सजलेली आहे. ही माझी स्वतःची प्लेट आहे जया जी. तुमची नाही."

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news