पुणे बाजार समिती: व्यापारी-अडते मतदारसंघातून जय शारदा गजानन पॅनलचे गणेश घुले, अनिरुद्ध भोसले विजयी

पुणे बाजार समिती: व्यापारी-अडते मतदारसंघातून जय शारदा गजानन पॅनलचे गणेश घुले, अनिरुद्ध भोसले विजयी
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापारी-अडते मतदार संघातील दोन जागांवर जय शारदा गजानन पॅनलचे गणेश घुले आणि अनिरुद्ध भोसले मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. गणेश घुले यांना सर्वाधिक ५ हजार ८५२ एवढी मते मिळाली तर अनिरुद्ध भोसले यांना ५ हजार ८१६ एवढी मते मिळाली. व्यापारी अडते मतदार संघात १३ हजार १७४ मतदानापैकी ८ हजार ७०७ (६६.०९) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार संघात अत्यंत चुरशीने प्रचार झाला होता. या निवडणुकीत बाजार समितीचे माजी संचालक विलास भुजबळ यांच्यासह अमोल घुले, सौरभ कुंजीर पराभूत झाले आहेत.

पराभूत झालेल्या उमेदवारांना मिळालेली मते

सौरभ कुंजीर 1640, अशोक गावडे 128, अमोल घुले 374, रमेश बडदे 32, सुहास बनसोडे 19, उमरफारुक बागवान 159, बाळासाहेब भिसे 194, विलास भुजबळ 650, अविनाश शेवते 38,शिवाजी सुर्यवंशी 1270.

या मतदार संघातील वैध मते ८ हजार २९१ असून ४१६ अवैध मते असल्याचे घोषित करण्यात आले. विजयाच्या घोषणेनंतर व्यापाऱ्यांनी सभागृहाबाहेर गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news