The Nun 2 ने Jawan ला टाकले मागे, युएस बॉक्स ऑफिसवर नन २ टॉपला

The Nun 2- Jawan
The Nun 2- Jawan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : द नन २ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चलती आहे. तर जवान चित्रपटाची कमाईबाबतीत घसरण झाली आहे. युएस बॉक्स ऑफिसवर द नन २ नंतर अ हॉन्टिंग व्हेनिस देखील कमाईच्या बाबतीत टॉपला (The Nun 2) आहे. नॉर्थ अमेरिकन बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या आठवड्यात द नन २ ने १४.७ मिलियन डॉलर कमाी केली आहे. तर अ हॉन्टिंग व्हेनिस ने १४.५ मिलियन कलेक्शन ओपनिंग ठरले आहे. दुसऱ्या आठवड्यात 'द नन-२' ची कमाईची गती चालूच राहिल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केनेथ ब्रनाघ (Kenneth Branagh) चा अ हॉन्टिंग व्हेनिस अद्यापही कलेक्शनच्याबाबतीत संघर्ष करत आहे. (The Nun 2)

दरम्यान, शाहरुख खानचा अॅक्शन-ड्रामा 'जवान' यूएस बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आला होता. आता जवामच्या कमाईत घसरण झाल्याने दुसऱ्या आठवड्यात दोन स्थानांनी जवानची घसरण झालीय. जवान सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

इंडस्ट्री निरीक्षकांच्या माहितीनुसार, या चित्रपटाने वीकेंडला जवळपास २५ लाख डॉलर कमावले होते. यूएसमध्ये त्याचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन १-१० लाख डॉलर झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news