Jawan Movie : झटक्यात ६५ कोटी! ओपनिंग डेला ‘जवान’ची बंपर कमाई, गदर २ ला टाकले मागे

jawan movie
jawan movie

Jawan Movie : झटक्यात ६५ कोटी! ओपनिंग डेला 'जवान'ची बंपर कमाई, गदर २ ला टाकले मागे
पुढारी ऑनलाईन डेस्क : किंग खान शाहरुख खानचा २०२३ हा मोस्ट अवेटेड चित्रपट 'जवान' चित्रपटगृहात रिलीज झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. 'जवान'ला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळत आहे. (Jawan Movie) दहीहंडी उत्सवाची सुट्टी आणि विकेंडच्या शनिवार आणि रविवार अशा सुट्ट्या आल्याने प्रेक्षकांची तुफान गर्दी चित्रपटगृहात होत आहे. 'जवान'ने पहिल्याच दिवशी तुफान कमाई करत 'पठाण', 'गदर-२'सह चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले, तर जाणून घेऊया 'जवान'ने पहिल्याच दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई केली. (Jawan Movie)

गदर २ ला टाकले मागे

शाहरुख खानच्या 'जवान'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बंपर कमाई करून इतिहास घडवला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ६५ कोटींचे कलेक्शन केले आहे. गदर २ ला देखील शाहरुखच्या या चित्रपटाने मागे टाकले आहे. यावर्षी रिलीज झालेल्या बॉलिवूडपट चित्रपटांच्या ओपनिंग कमाईच्या तुलनेत जवान प्रचंड पुढे आहे. शाहरुखच्या 'पठाण'चा ओपनिंग डेचादेखील रेकॉर्ड जवानने मोडीत काढला आहे. यासोबतच 'जवान' बॉलिवूडचा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे.

जवानमध्ये शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news