Javed Akhtar Court summons: अभिनेत्री कंगना तक्रारप्रकरणी गीतकार जावेद अख्तरांना समन्स

Javed Akhtar Court summons: अभिनेत्री कंगना तक्रारप्रकरणी गीतकार जावेद अख्तरांना समन्स

पुढारी ऑनलाईन: अभिनेत्री कंगना राणावत हिने दिलेल्‍या तक्रारीवरुन गीतकार लेखक जावेद अख्तर यांना समन्स बजावण्यात आला आहे. मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावले (Javed Akhtar Court summons) आहे.  न्यायालयाने अख्तर यांना ५ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

2020 मध्ये एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली बदनामी केल्याचा आरोप करत अख्तर यांनी कंगनाविरूद्ध पोलिसात धाव घेतली होती. यानंतर अभिनेत्री कंगना हिनेही जावेद अख्तर यांच्या विरूद्ध तक्रार  दाखल केली होती. यामध्ये तिने म्‍हटले हाेते की, एका अभिनेत्यासोबत माझे वैयक्तिक भांडण झाले होते, तेव्हा जावेद अख्तर यांनी मला धमकावले होते. ( Akhtar Court summons) अभिनेत्री कंगना राणावत हिने दाखल केलेल्या तक्रार प्रकरणी सध्या साक्षीदार तपासले जात आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news