जनसुराज्य भाजपला साथ देणार; आ. विनय कोरे यांची माहिती

जनसुराज्य भाजपला साथ देणार; आ. विनय कोरे यांची माहिती

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जनसुराज्य शक्ती पक्षाची लोकसभा लढण्याची तयारी नाही. मात्र मित्रपक्ष भाजपला साथ नक्कीच देणार आहे. आमच्या पक्षाची ज्या सात ते आठ मतदारसंघांत ताकद आहे. तेथे महायुतीच्या उमेदवारांच्या पाठिंबा ताकदीने राहणार आहे, अशी माहिती आ. विनय कोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आ. कोरे म्हणाले, लोकसभेला महायुतीस पाठिंबा दिला आहे. मात्र, भाजपने आमचा विधानसभेला गांभीर्याने विचार केला पाहिजे. प्रा. संजय मंडलिक यांची भेट झाली. मात्र, कोल्हापूर लोकसभेबाबत उलटसुलट चर्चा सुरू असल्याने माझी भेट घेतली. आ. रोहित पवार यांनी राजकीय आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपातील घोटाळ्यात तथ्य नाही. चार कंपन्यांना ठेका दिला. इंदापूर आणि कर्नाटकमधीलही कंपन्या आहेत. मात्र दोन कंपन्यांंची नावे घेऊ दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्याला उत्तर देण्याची गरज नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news