Janhvi Kapoor-Rajkummar Rao : जान्हवी कपूरसोबत नव्या चित्रपटात रोमान्स; राजकुमारने लिहिलं..

Rajkummar Rao - Janhvi Kapoor
Rajkummar Rao - Janhvi Kapoor

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांचा आगामी मिस्टर ॲण्ड मिसेस माही चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली आहे. (Janhvi Kapoor-Rajkummar Rao) चित्रपट १९ एप्रिल, २०२४ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार होता. आता नव्या तारखेनुसार ३१ मे, २०२४ रोजी रिलीज होणार आहे. राजकुमार रावसह निर्मात करण जोहरने सोशल मीडियावर नव्या तारखेची घोषणा केली आहे. (Janhvi Kapoor-Rajkummar Rao)

जान्हवीने सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले आहे-"Love scores a century on May 31st, 2024! (sic)".

राजकुमार राव श्रीकांत चित्रपटामुळेही चर्चेत आहे. ट्रेलर रिलीज नंतर सिनेप्रमी राजकुमारचे खूप कौतुक करत आहेत. आता जान्हवीसोबत तो नव्या चित्रपटात झळकणार अशून करण जोहर निर्मित मिस्टर अँड मिसेस माहीमध्ये राजकुमार राव- जान्हवी कपूरसोबत मुख्य भूमिकेत आहे.

राजकुमार रावने इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये लीड स्टार्सचा लूक दाखवण्यात आलेला नाही. यामध्ये फक्त रिलीज डेट दाखवण्यात आली आहे. चित्रपट ३१ मे, २०२४ रोजी चित्रपटगृहात रिलज होणार आहे. राजकुमारने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, "प्रेम सेंचुरी मारेल."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news