काश्‍मीरमध्‍ये सुरक्षा दलास मोठे यश, दहशतवादी जेरबंद

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
जम्‍मू -काश्‍मीरमध्‍ये सुरक्षा दलाची दहशतवाद्‍यांविरोधात मोहिम सुरु आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्‍या ( सीआरपीएफ ) जवानाच्‍या हत्‍या करणार्‍या दहशतवाद्‍यासह त्‍याच्‍या सहकार्‍याला अटक करण्‍यात आली आहे. 'लश्‍कर'चा कमांडर आबिद रमजान शेख यांच्‍या आदेशानुसार दहशतवाद्‍याने सीआरपीएफच्‍या जवानाची हत्‍या करण्‍यात आल्‍याचे पोलिसांच्‍या प्राथमिक तपासात स्‍पष्‍ट झाले आहे.

याप्रकरणी माहिती देताना पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) विजय कुमार यांनी सांगितले की, दहशतवाद्‍यानी शनिवारी छोटीपोरा गावातील सीआरपीएफच्‍या जवानाची हत्‍या झाली होती. या घटनेनंतर वरिष्‍ठ अधिकार्‍यांनी घटनास्‍थळी पाहणी केली. स्‍थानिक पोलिसांसह सुरक्षा दलाच्‍या जवानाने शोध मोहिम राबवली. यावेळी दहशतवादी व त्‍याच्‍या एका सहकार्‍याला ताब्‍यात घेण्‍यात आले. यानंतर सीआरपीएफच्‍या जवानाच्‍या हत्‍येची कबुली संबंधितांनीदिली.

मागील १३ दिवसांमध्‍ये तीन जवानांच्‍या हत्‍या

जम्‍मू -काश्‍मीरमध्‍ये मागील १३ दिवसांमध्‍ये तीन जवानांच्‍या हत्‍या झाल्‍या आहेत. २८ फेब्रुवारी रोजी श्रीनगरमध्‍ये एसीबीचे शेखर फिरदौस यांची गोळ्या घालून हत्‍या करण्‍यात आली. यानंतर १० मार्च रोजी बडगाम धेये प्रादेशिक सेनेचे जवान समीर अहमद यांची तर १२ मार्च रोजी सीआरपीएच्‍या जवानाची हत्‍या करण्‍यात आली. सीआरपीएफच्‍या जवनाची हत्‍या ही 'लश्‍कर'चा कमांडर आबिद रमजान शेख यांच्‍या सांगण्‍यावरुच दहशतवाद्‍याने कल्‍याचे पोलिचसांच्‍या प्राथमिक तपासात स्‍पष्‍ट झाले आहे.

हेही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news