Maratha Reservation Protest Jalna : मराठा आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Maratha Reservation Protest Jalna : मराठा आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार्‍या आंदोलकांवर झालेली लाठीचार्जची घटना निषेधार्ह आहे. मी महाराष्ट्र सरकारचा निषेध करते. गेल्या चार दिवसांपासून शांततेने आंदोलक सुरू आहे. पण पोलिसांनी गुरुवारी अमानुष पद्धतीने लाठीचार्ज केला. ज्यात अनेकजण जखमी झाले. खरतंर हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. गृहमंत्रालय आणि गृहमंत्री यांचे हे अपयश आहे. त्यांनी याचे उत्तर दिले पाहिजे, हे झालंच कसं आणि का? याबाबत त्यांनी खुलासा करणे आवश्यक आहे, अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे. 'पुढारी न्यूज'शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news