वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजूनही वैद्यकीय उपचार सुरुच आहेत. डॉक्टरांच्या पथकाने आज (शनिवार) सकाळी पुन्हा जरांगे यांची तपासणी केली. काल रात्री उशिरा मनोज जरांगे यांच्या यांच्या छातीत वेदना होत होत्या. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावले होते. दरम्यान आज सकाळी डॉक्टरांच्या पथकाने पुन्हा त्यांची तपासणी केली असून परत सलाईन लावण्यात आली आहे.
त्यांचा ईसीजी काढला असून त्यात कोणताही बदल आढळून आला नाही. ईसीजी चांगला आहे. रक्ताचे नमुने घेतले आहेत, रिपोर्ट नुसार पुढील उपचार केले जातील असे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ राजेंद्र तारख यांनी सांगितले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात चार दिवसांच्या उपचारांनंतर मनोज जरांगे पाटील शुक्रवार रोजी पुन्हा अंतरवाली सराटीत दाखल झाले होते. मात्र शुक्रवारी रात्री अचानक त्यांच्या छातीत वेदना होत असल्याने डॉक्टरांच्या पथकाने त्यांची रात्रीच तपासणी करून उपचार सुरू केले होते. शनिवार रोजी सकाळी रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच सलाईन सुरू असून ते उपचाराला प्रतिसाद देत असल्याने पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलविण्याची आवश्यकता नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
हेही वाचा :