जालना : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरची टेम्‍पोला धडक, २ जण जखमी

डंपरची टेम्‍पोला धडक
डंपरची टेम्‍पोला धडक
Published on
Updated on

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने वीट वाहतूक करणाऱ्या टेंम्पोला धडक दिली. या भीषण अपघातात दोन जण जखमी झाले आहेत, तर दैव बलवत्तर म्हणून दोन जण बचावले. ही घटना वडीगोद्री-जालना मार्गावरील वडीगोद्रीजवळ आज (बुधवार) 10:30 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. या अपघातानंतर अवैध वाळू वाहतूक केंव्हा बंद होणार असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्‍थित होत आहे.

शहागडहुन अंबडकडे वीट घेऊन जाणारा टेंम्पो क्रमांक एम एच 04 एफ यु 0424 ला अंबड कडून शहागडकडे अवैध वाळू खाली करून जाणारा विना क्रमांकाच्या डंपरने टेम्पोला जोराची धडक दिली. या धडकेत विटांचा टेम्पो रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्ड्यात जाऊन पलटी झाला. प्रसंगावधान राखत चालक व मजूरांनी उड्या मारल्याने सुदैवाने ते बचवाले. मात्र यामध्ये संतोष सुंदर देहाडे (वय 23) रा.पिंपरखेड घनसावंगी, विशाल संतोष शेंडगे (वय 20) रा.कुरण ता. अंबड हे दोघे जखमी झाले, तर चालक दत्ता विष्णू शिंदे (वय 22) रा. कुरण ता. अंबड व त्रिंबक बर्डे (वय 60) रा.पिंपरखेड घनसावंगी हे दोघे बचावले.

अवैध वाळू वाहतूक करणारा डंप्पर चालक अपघात होताच फरार झाला आहे. या अपघातानंतर वडीगोद्री-जालना मार्गांवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, तर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news