जालना : शेगाव दर्शनाहून परतताना कारचा अपघात; महिलेचा होरपळून मृत्‍यू

 कारला अपघात
कारला अपघात

परतूर ; पुढारी वृत्‍तसेवा शेगांवला दर्शनाहून परत परतूरकडे येत असताना मंठा तळणी रोडवर मंठापासून पाच किमी अंतरावर कारला पाठीमागून एका वाहनाने धडक दिली. यामध्ये कारने पेट घेतला. यावेळी कार मध्ये असलेल्‍या महिलेचा जागीच होरपळून मृत्यू झाला. ही घटना आज (शुक्रवार) पहाटे तीन वाजता घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, परतूर तालुक्यातील क-र्हाळा येथील अमोल सोळंके पत्नी सविता अमोल सोळंके (वय ३३) हे दोघे पती-पत्नी गुरुवारी शेगांवला दर्शनाला गेले होते. दर्शन करून रात्री उशिरा गावाकडे येत असतांना तळणी मंठा जवळ एका वाहनाने पाठी मागून धडक दिल्याने सोळंके यांनी आपली कार थांबवली आणि मागील चालकास अमोल सोळंके कार मधून उतरून बोलत असतांना कारने अचानक पेट घेतला. कारला मोठ्या प्रमाणात आग लागली. यावेळी अमोल सोळंके यांनी पत्नीला वाचविण्यासाठी कराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र कारला लागलेल्या आगीपुढे प्रयत्न निष्फळ ठरले.

या आगीत पत्नी सविता अमोल सोळंके यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. मृत सविता सोळंके यांना मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news