जळगाव : वाळू माफियाच्या प्राणघातक हल्ल्यातील दोन गुन्हेगार अटकेत 

जळगाव : वाळू माफियाच्या प्राणघातक हल्ल्यातील दोन गुन्हेगार अटकेत 
Published on
Updated on

जळगाव  : पुढारी वृत्तसेवा

रात्रीला अवैध वाळू होत असल्याच्या कारणावरुन डंपरवर कारवाई करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले. या हल्ल्यातील आठ आरोपींपैकी दोन आरोपींना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. शासनाचे नुकसान होईल असे अनधिकृत कृत्य नागरिकांनी करू नये व अवैध वाळू माफियांना थारा देऊ नका असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भुसावळ दौरा केला. याप्रसंगी ते की वाळू माफिया मोटरसायकलने पाळत ठेवत आहे ही बाब धोकादायक परिस्थिती निर्माण करू शकते. त्यासाठी महसूल विभागाने पर्याप्त वाळू उपलब्ध करून देण्यासाठी नव्या ठिकाणचे लिलाव आज केले जात आहे. संपूर्ण परवानगी घेऊन 38 वाळू गट येणार आहेत. त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात वाळू साठा उपलब्ध होणार आहेत. अधिकृतपणे टेंडर भरून वाळू विकत घ्यावी शासनाला नुकसान होईल असे अनधिकृत कृत्य करू नये अवैध वाळू माफियांना थारा देऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर झालेल्या हल्ल्यात व हल्ला करणाऱ्या आठ जणांपैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत तसेच एक डंपर जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आलेल्या तरी दुसऱ्या नंबरचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच वाळू भरणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. काही प्रमाणात वाळू माफियांवर रोष दिसून येत आहे व या घटनेत तो तीव्र झालेला आहे ही बाब चिंताजनक आहे पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे.

जिल्हा प्रशासनाने वाळू चोरी होणाऱ्या घाटांचा शोध घेऊन असे 118 वाळूचे घाट शोधून काढले आहेत. यामधील काही घाटांवर मिश्रित वाळू आहे ते वगळल्यास 38 ठिकाणी चांगली वाळू आहे. वाळूचे टेंडर करताना काही अडचणी येतात. त्यामध्ये मुख्य पर्यावरण व इतर परवानगी घ्यावी लागते. तसेच 30 सप्टेंबर नंतर वाळूचे इस्टिमेट काढावे लागते. तालुका जिल्हा राज्यस्तरावर हा प्रस्ताव जात असतो टेक्निकल विभाग, पर्यावरण त्यानंतर जलद जलविभाग, जिल्हास्तरीय राज्यस्तरीय मान्यता करावी लागते. जिल्हास्तरावर किंवा राज्यस्तरावर कुठेही प्रस्ताव थांबलेला नाही असे जिल्हाधिकारी म्हणाले.

जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत जलजीवन बाराशे कोटी पैकी 1000 कोटींचे कामे सुरू आहे डीपीडीसीच्या माध्यमातून 675 कोटीचे प्रमाण झालेली आहेत. त्याची वर्क ऑर्डर निघालेली असून पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत कामे सुरू आहेत. तसेच खाजगी बांधकामे सुरू आहे. सिमेंट विक्रीच्या जीएसटी मधून सिमेंट विक्री वाढलेली आहे हे समोर आलेले असल्याने नागरिकांनी जिल्ह्यात किंवा अधिकृत ठिकाण वाळू द्यावी आणि अधिकृत वाळू घेणे हा गुन्हा असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news