जळगाव : स्टेट बँक दरोडा प्रकरण; नाल्यात आढळले डीव्हीआरसह बँक कर्मचार्‍यांचे पाच मोबाईल 

जळगाव : गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. (छाया: चेतन चौधरी)
जळगाव : गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. (छाया: चेतन चौधरी)
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दिवसाढवळ्या दरोडा पडल्याची घटना गुरुवार (दि. १) घडली आहे. बँक व्यवस्थापकाच्या तक्रारीनुसार दरोडेखोरांनी बँकेतील १७ लाख रुपये रोकड आणि तीन कोटी रुपयांचे सोन्याचा ऐवज लुटून नेला आहे. सिनेस्टाईल पडलेल्या दरोड्याच्या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर याप्रकरणी पोलिस तपासातून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनसुार, दरोडेखोरांनी अवघ्या १५ मिनिटात बँक मॅनेजरसह कर्मचार्‍यांना बंधक बनवत १७ लाखांच्या रोकडसह तीन कोटी ६० लाखांचे सोने लुटून नेले आहे. दरोडा टाकल्यानंतर मॅनेजरच्याच दुचाकीवरून पसार झाले होते. आता पोलिसांना याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. दुचाकीवरून जात असतांना दोन्ही दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
पोलिसांनी जप्त केल्या या वस्तू
दरोडेखोरांनी अयोध्या नगर भागातील नाल्याजवळ गुन्ह्यात वापरलेला धारदार चॉपरसारखा चाकू, हेल्मेट, बँकेतून लांबवलेला डीव्हीआर, मॅनेजरसह कर्मचार्‍यांचे फेकलेले पाच मोबाईल फेकले आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत या सर्व वस्तू जप्त केल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शंकर शेळके करीत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news