जळगाव : तुकाराम वाडीतील घरात घुसुन जीवघेणा हल्ला करणाऱ्या सहा संशयितांना अटक

जळगाव : तुकाराम वाडीतील घरात घुसुन जीवघेणा हल्ला करणाऱ्या सहा संशयितांना अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
तुकाराम वाडी मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने २०२२ मध्ये जुन्या वादातून फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीचा राग मनात धरून आरोपींनी त्याच्या घरात घुसून शिवीगाळ करत घराचे दरवाजे व खिडकी तोडून नुकसान केले. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. रविवार (दि.७) रोजी रात्री एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील सहा संशयित आरोपींना वाघ नगर परिसरातून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, शहरातील तुकारामवाडी येथे राहणारे अरुण भीमराव गोसावी (वय-४७) याने २०२२ मध्ये झालेल्या खूनाच्या संदर्भात संशयित आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली होती. याचा राग धरून संशयित आरोपी भूषण उर्फ भासा विजय माळी, आकाश उर्फ सुकलाल खंड्या ठाकूर, पवन उर्फ बंद्या दिलीप बाविस्कर, सचिन उर्फ टिचकुल्या कैलास चौधरी (सर्व रा. तुकाराम वाडी, जळगाव) आकाश उर्फ ब्रो. रवींद्र मराठे आणि चेतन उर्फ बटाट्या रमेश सुशील (दोन्ही रा. पिंपळा) यांनी शनिवारी (दि.६) रोजी रात्री ११ वाजता अरुण गोसावी यांनी फिर्याद दाखल केली म्हणून त्यांच्या घरात घुसून शिवीगाळ करत जीवघेणा हल्ला चढविला. यात संशयित आरोपींनी गोसावींच्या घरात घुसून त्यांच्या घराचे दरवाजे खिडक्या आणि घरातील सामानांची तोडफोड करून नुकसान केले. शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. या संदर्भात दुसऱ्या दिवशी रविवार (दि.७) रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुन्ह्यातील संशयित आरोपी फरार झाले होते. दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी मंगळवार (दि.९) रोजी रात्री संशयित आरोपींना वाघनगर परिसरातून अटक केली आहे. तर अटकेतील संशयित आरोपींना बुधवारी (दि.१०) रोजी दुपारी ३ वाजता जळगाव सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, ललित नारखेडे, छगन तायडे, किरण पाटील, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, संजीव मोरे आणि साईनाथ मुंडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news