जळगाव : परिवाराकडून रक्षा खडसे यांनी आशिर्वाद घेत बजावला मतदानाचा हक्क

जळगाव : खासदार रक्षा खडसे यांनी वाढदिवस साजरा करून मतदानाच्या दिवशी सासरे एकनाथ खडसे यांचा आशीर्वाद घेतला.
जळगाव : खासदार रक्षा खडसे यांनी वाढदिवस साजरा करून मतदानाच्या दिवशी सासरे एकनाथ खडसे यांचा आशीर्वाद घेतला.
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जळगाव लोकसभेच्या मतदान टप्प्याला सुरुवात झालेली आहे आज सोमवार (दि.१३) रोजी मतदानाचा दिवस आहे. तर याच दिवशी रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी आपल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोठडी येथील घरी सासरे एकनाथराव खडसे सासू मंदा खडसे यांच्या उपस्थितीत केक कापून त्यांचे आशीर्वाद घेऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.

आज सोमवार (दि.१३) रोजी हा मतदानाचा दिवस चौथ्या टप्प्यातील लोकसभेसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात मतदान करीत आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या रावेर लोकसभेच्या खासदार व उमेदवार रक्षा खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोठडी या गावात सकाळीच वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. सासरे एकनाथराव खडसे यांनी रक्षा यांना केक खिलवून सुनबाई रक्षा खडसे यांना विजयासाठी आशीर्वाद दिले आहेत.  तसेच मंदा खडसे यांनी सुद्धा आशीर्वाद देऊन सर्व परिवाराने एकत्रित मतदानाचा हक्क बजावला आहे.

एकूणच निवडणूकीच्या धामधुमीत सुद्धा आनंदाने विसाव्याचे क्षण अनुभवण्याकरीता खडसे परिवार एकत्रित आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news