Jalgaon Crime : धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दंगल, 18 जणांविरोधात गुन्हा

file photo
file photo

जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये प्रचंड हाणामारी होवुन दंगल घडली. यात दोन जण जखमी झाले आहे. तर याप्रकरणी दोन्ही गटाकडून यावल पोलिस ठाण्यात तब्बल १८ जणाविरुद्ध दंगली सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किनगाव तालुका यावल या गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर सार्वजनिक जागेवर धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि हाणामारी होत यात लोखंडी कडे, फायटर याचा वापर होत दंगल घडली.  यामध्ये सागर सपकाळे वय २१ व उखा जाधव वय ५० हे दोन जण जखमी झाले. यातील जखमी २१ वर्षीय सागर सपकाळे या तरुणाला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता आणण्यात आले व याप्रकरणी जखमी सागर बापू सपकाळे याच्या फिर्यादी वरून तोताराम पाटील, ऋषिकेश कुंभार, किरण कंडारे, सागर जाधव, गजू जाधव, उखा कैकाडी, निलेश कंडारे या सात जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या गटाकडून उखा रामलाल जाधव वय ५० यांच्या फिर्यादीवरून रोहित दिलीप वानखेडे, रोहन राजू निकम, सागर बापू सपकाळे, प्रशांत जीत सोनवणे, विशाल तायडे, गणेश दिलीप साळुंखे, राहुल बापू साळुंखे, नाना मधुकर साळुंखे, गोल्या विजु साळुंखे, बापू सपकाळे व सागर राजू निकम या ११ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटाकडून एकमेका विरुद्ध फिर्यादी दिल्याने एकुण १८ जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमाने गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले व पोलिस करित आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news