Jalgaon News | मुक्ताईनगरला नाकाबंदी दरम्यान कारमधील 20 लाखांच्या सोन्याच्या वस्तू जप्त

Jalgaon News | मुक्ताईनगरला नाकाबंदी दरम्यान कारमधील 20 लाखांच्या सोन्याच्या वस्तू जप्त

Published on

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुक्ताईनगरात नाकाबंदी लावण्यात आली होती. या नाकाबंदी दरम्यान तपासणी सुरु असताना एका संशयित कारमधून तब्बल 20 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहे. संशयित कार येताना दिसताच कार थांबवून कारची तपासणी केली असता त्यामध्ये २७९.७३० ग्रॅम वजनाचे सोन्याच्या वस्तु (अंदाजे किमत २० लाख रुपये) कोणत्याही पावती विना, विना परवाना मिळून आल्या. फिरते पथक प्रमुख असिस्टंट इंजीनीयर अनिल नेरपगार, पंचायत समीती बोदवड यांना बोलावून त्याच्याकडे पुढील कायदेशीर कारवाईसाठी या वस्तू हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, (दि. 22) जिल्हयाचे पोलीस अधिक्षक महेश्वर रेडड़ी यांच्या आदेशाने व उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर राजकुमार शिंदे, मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक नागेश मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस स्टेशनअंतर्गत परिवर्तन चौक येथे लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान नाकाबंदी पथकाचे सपोनि. संदीप धुमगहू, पो.हवा. छोटु वैद्य, पो.शि. प्रशांत चौधरी, पोशि.प्रविण जाधव, पोशि. अभिमण पाटील यांना एक संशयित कार येताना दिसली. कार थांबवून कारची तपासणी केली असता कारमध्ये भवरलाल जेठमल जैन, राह. जळगाव यांच्या बॅगमध्ये २७९.७३० ग्रॅम वजनाचे सोन्याच्या वस्तु अंदाजे किमत २० लाख रुपये कोणत्याही पावती विना/परवाना मिळुन आले. सदरची कारवाई मुक्ताईनगर पोलीस ठाणे यांनी केली आहे. अशी माहिती जनसंपर्क अधिकारी पोलीस अधिक्षक कार्यालय, जळगाव यांनी पत्रकार द्वारे दिली.

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news