जळगाव : कडेकोट बंदोबस्तात ईव्हीएम मशीन मतदान केंद्रांवर रवाना 

जळगाव : कडेकोट बंदोबस्तात ईव्हीएम मशीन मतदान केंद्रांवर रवाना 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभेसाठी सोमवार (दि.१३) रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सकाळी आठपासून जिल्ह्यातील तहसील कार्यालय व इतर ठिकाणावरून मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी पोलीस ईव्हीएम मशीन घेत रवाना झालेले आहेत. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघातील 3886 एकूण बूथवर व्हीव्हीपॅड बॅलेट मशिन १५९३ वाहनातून रवाना करण्यात आले आहे.

लोकसभेच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठी रविवार (दि.१२) रोजी सकाळी आठ पासून तालुक्याच्या ठिकाणावरून तालुक्यामधील मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन 1593 वाहनांमधून रवाना झाले आहेत. जळगाव लोकसभेसाठी 20 उमेदवार रिंगणात असून रावेर लोकसभेसाठी 29 उमेदवार रिंगणात आहेत. सोमवार (दि.१३) रोजी सकाळी 7 ते 6 च्या दरम्यान मतदान होणार आहे. ईव्हीएम मशीन मध्ये जिल्ह्यातील ४९ उमेदवारांचे भवितव्य बंद होणार आहे.

हवामान खात्याकडून 13 मे रोजी जळगांव लोकसभेमध्ये व रावेर मतदार संघामध्ये 39 ते 41 अंश किमान 25 ते 27 अंश तापमान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. दुपारी व सायंकाळी हलका पाऊस किंवा वादळी वाऱ्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. जळगाव शहरांमध्ये अकरा मतदान केंद्रांवर मॉडेल मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहे. यामध्ये महिला विशेष मतदान केंद्र, सखी मतदान केंद्र, फ्लाॅवर गार्डन, युवा मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र, महिला विशेष मतदान केंद्र, महाराष्ट्राची संस्कृती जोपासत आदर्श मतदान केंद्र अशी थीम ठेवण्यात आली आहे. कला साहित्य, दिव्यांग औद्योगिक आणि दिव्यांग असे विशेष मतदान केंद्र बनवण्यात आलेले आहेत. जळगाव लोकसभेसाठी 1037350 पुरुष, 956611 महिला, 85 तृतीय असे एकूण 1994046 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. रावेर लोकसभेमध्ये 941732 पुरुष, 879964 महिला, 54 तृतीय असे एकूण 1821750 मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

  • जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील एकूण बूथ – 3886
  • शहरातील 11 मतदान केंद्र विशेष आदर्श मतदान केंद्र म्हणून स्थापन करण्यात आलेले आहेत.
  • रावेर मतदार संघातील बूथ 1904
  • जळगाव मतदार संघातील बूथ 1982
  • एकूण मतदान कर्मचारी 17821
  • एकूण वाहने 1593
  • वाहनामध्ये बसेस 392
  • जीप 23
  • टेम्पो 8
  • क्रुझर 475
  • स्कूल बस 70
  • दिव्यांग मतदान केंद्र 21
  • महिला मतदान केंद्र 33
  • युवा मतदान केंद्र 11
  • आदर्श मतदान केंद्र 55

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news