Jalgaon Crime News | दहशत माजवणाऱ्या कोयतागँगचा फरार आरोपीस चाळीसगावमधून अटक

Jalgaon Crime News | दहशत माजवणाऱ्या कोयतागँगचा फरार आरोपीस चाळीसगावमधून अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
पुणे शहरात दहशत माजवणाऱ्या कोयतागँगचा फरार आरोपीस चाळीसगाव शहरातून अटक केली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत असताना गावठी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस व चॉपर मिळून आले आहे. त्याच्याविरुद्ध चाळीसगाव पोलिसामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शनिवार (दि. २४) रोजी चाळीसगाव शहरात हद्दितील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत असताना शहर पोलीसंना मिळालेल्या गुप्त माहीतीनुसार ऋषिकेश ऊर्फ मायकल व त्याचे वडील दिपक भटू पाटील (रा. श्रीकृष्ण नगर करगांव रोड, चाळीसगाव) त्याच्या राहत्या घरात हत्यारे बाळगत असल्या बाबत माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ऋषिकेश ऊर्फ मायकल व त्याचे वडील दिपक भटू पाटील याच्या घरात एक गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस व चॉपर मिळून आले आहे.

गावठी पिस्तूल व काडतूस हे त्याने पुणे येथील कोयता गँगचा सदस्य निखील जगन्नाथ शिंदे उर्फ बंडी निक्या (रा. लक्ष्मीनगर, येरवडा पुणे) व त्याच्या मित्राकडुन २१,५००/- रुपयास विकत घेतल्याची माहिती दिली. तो चाळीसगाव शहरात वास्तव्यास असल्याची माहितीनुसार त्याला त्वरीत अटक करण्यात आली. निखील जगन्नाथ शिंदे उर्फ बंडी सराईत गुन्हेगार असून तो येरवाडा पुणे येथील कोयता गँगचा सदस्य आहे.

कोयता गँग मधील सदस्यांनी रविवार (दि. २५ डीसेंबर २०२३) रोजी रात्रीच्या सुमारास लक्ष्मीनगर , येरवडा पुणे या भागात हातात कोयते, तलवारी व दगड घेवुन सुमारे ३० ते ३५ वाहनांच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली होती. याबाबत येरवडा पोलीसात गुन्हा नोंद आहे. हा गुन्हयात गुन्हा घडल्यापासून निखील शिंदे उर्फ बंडी निक्या हा फरार होता. या आरोपीविरुध्द चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वरीष्ठ पाेलीस निरीक्षक योगेश माळी व पोलीस कल्पेश पगारे करीत आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहा पोलीस अधिकक्षक अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखली पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news