जळगाव क्राईम : घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत चक्क चार महिने तो बहिणीवरच करत होता अत्याचार

जळगाव क्राईम : घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत चक्क चार महिने तो बहिणीवरच करत होता अत्याचार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
काकाकडे राहणाऱ्या पुतण्याने गेल्या चार महिन्यांपासून घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत चक्क स्वत:च्या चुलत बहिणीवरच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. बहिण भावाच्या नात्याला काळीमा फसणारी घटना सोमवार दि. ११ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीला अटक करण्यात आली आहे. यावरुन पुन्हा अल्पवयीन मुलांमध्ये 'गुड टच, बॅड टच' बाबत मुलांना लगेचच बोलते करण्याचा मुद्दा अधोरेखित होत आहे.

शहरातील एका परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून ही अल्पवयीन मुलगी इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत आहे. त्यांच्यासोबत तिच्या घरी काकांचा मुलगा देखील राहत आहे. मुलीचे कुटुंबिय घरी नसतांना मुलीचा चुलत भाऊ हा तिच्यावर अत्याचार करीत होता. सतत गेल्या चार महिन्यांपासून तो मुलीवर अत्याचार करीत होता. त्यानंतर तो बहिणीला मारहाणही करीत असे. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी समुपदेशकांनी पोलीसात दिलेल्या तक्रारीवरुन शनिपेठ पोलिसात पोक्सोकायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news