Jalgaon Bribe News :  पाच हजारांची लाच घेतांना ग्रामसेवकास रंगेहाथ अटकेत

Jalgaon Bribe News :  पाच हजारांची लाच घेतांना ग्रामसेवकास रंगेहाथ अटकेत

जळगाव  : पुढारी वृत्तसेवा
चोपडा तालुक्यातील पारगाव येथील शेतकऱ्याला त्याच्या शेतात वेअर हाऊस बांधण्याची परवानगी दिली म्हणून मोबदला मागणाऱ्या ग्रामसेवकाला पाच हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ बुधवार दि. 31 रोजी अटक करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील धानोरा येथील राहणारे तक्रारदार यांचे पारगाव येथे शेत आहे. त्यामध्ये वेअर हाऊस बांधण्याकरीता ग्रामपंचायतची परवानगी मिळावी यासाठी तक्रारदार यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी अर्ज केला होता. त्याप्रमाणे ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे यांनी तक्रारदार यांना वेअर हाऊस बांधकामाची परवानगी दिली. केलेल्या कामाचा मोबदला म्हणून तक्रारदार यांच्याकडे सुमारे 7500 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यानुसार बुधवार, दि. 31 रोजी ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे यांनी तडजोडीअंती पाच हजार रुपयाची लाच घेताना पोलीस उपअधीक्षक, सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेशसिंग पाटील पोलीस नाईक बाळू मराठे, पोलीस कॉन्सटेबल राकेश दुसाने यांनी कारवाईसाठी मदत पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, सहायक फौजदार सुरेश पाटील, पोलीस हवालदार रविंद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी, यांच्या समुहाने रंगेहाथ पकडले आहे. ग्रामसेवक सोनवणे यांच्यावर अडावड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news