चक्क थ्री-डी प्रिंटरने बनवली जिलेबी!

चक्क थ्री-डी प्रिंटरने बनवली जिलेबी!

नवी दिल्ली : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर लोक कसा करतील हे काही सांगता येत नाही. आता एका व्यक्तीने चक्क थ्री-डी प्रिंटरच्या सहाय्याने जिलेबी बनवली आहे. या अनोख्या जिलेबीची माहिती उद्योजक आनंद महिंद्रा यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर दिली आहे. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून अनेक लोक थक्क होत आहेत.

40 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये एक हलवाई चक्क थ्री-डी प्रिंटरने जिलेबी बनवत असताना दिसतो. थ्री-डी प्रिंटरच्या नोझलद्वारे तो उकळत्या तेलाच्या कढईत जिलेबी सोडत असताना दिसतो. महिंद्रा यांनी म्हटले आहे की मी तंत्रज्ञानाचा चाहता आहे; पण थ्री-डी प्रिंटर नोझलमधून जिलेबी बनवल्या जात असताना पाहून माझ्या मनात संमिश्र भावना आल्या. जिलेबी माझा आवडता पदार्थ आहे आणि तो हातानेच बनवला जावा असे मला वाटते. माझ्यासाठी ही एक कलाच आहे.

कदाचित मी विचार करतो त्यापेक्षाही अधिक जुन्या वळणाचा असू शकतो!' थ्री-डी प्रिंटरने बनवलेल्या या जिलेबींचा आकार सामान्य जिलेबीपेक्षा मोठा असून त्यामधील गोलाकार वळणेही अधिक आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा हा अनोखा आविष्कार चक्क पाकिस्तानात पाहायला मिळत आहे. तेथील फैसलाबाद येथील एका हलवायाने जिलेबी बनवण्यासाठी हा नवा फंडा केला आहे!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news