पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणा पानीपतचे डेप्युटी जेलर (Deputy Jailor Death) जोगिंदर देशवाल यांचा व्यायाम करताना मृत्यू झाला. रिपोर्टनुसार, त्यांचे हार्ट ॲटॅकने त्यांचे निधन झाल्याचे म्हटले जात आहे. (Jailor Heart Attack in Gym)
संबंधित बातम्या –
माहितीनुसार, हरियाणाच्या पानीपत जिल्ह्यातील सिवाह गावात तुरुंगाचे डीएसपी जोगिंद्र देशवाल तैनात आहेत. करनालच्या जिममध्ये व्यायाम करताना त्यांचे निधन झाले. सकाळी ते व्यायाम करत होते. यादरम्यान, ते खाली कोसळले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले. डीएसपी जोगिंदर देशवाल यांच्या निधनानंतर पानीपत पोलिस प्रशासनासहित हरियाणा पोलिसांत शोककळा पसरलीय.