Jailer Rajinikanth : ‘जेलर’च्या निमित्ताने सुपरस्टारची क्रेझ!

Jailer Rajinikanth : ‘जेलर’च्या निमित्ताने सुपरस्टारची क्रेझ!
Published on
Updated on

सुपरस्टार रजनीकांतच्या 'जेलर' चित्रपटाने पहिल्या दिवशी धुमधडाक्यात 44 कोटींचा व्यवसाय केला आणि दुसर्‍याच दिवशी सहजपणे 50 कोटींचा टप्पाही पार केला. तामिळनाडूत 23 कोटी, कर्नाटकात 11 कोटी, केरळमध्ये 5 कोटी, तेलंगण, आंध— प्रदेशमध्ये 10 कोटी आणि अन्य राज्यांत एकत्रित 3 कोटी रुपयांचे बॉक्स कलेक्शन झाल्याचा अंदाज नोंदवला गेला आहे.

2023 मध्ये तामिळनाडू व केरळमध्ये प्रथमच एखाद्या चित्रपटाला इतकी सरस ओपनिंग मिळाली असल्याचे यानिमित्ताने सांगितले जाते. इतकेच नव्हे तर एखाद्या तामिळ चित्रपटाला भारतात पहिल्याच दिवशी इतकी उत्तम कमाई मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. नेल्सनने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सुपरस्टार रजनीकांतने या चित्रपटात अपेक्षेप्रमाणे जेलर 'टायगर' मुथूवेल पांडियनची भूमिका साकारली आहे. जेलमधील काही कैदी आपल्या मुख्य सहकार्‍याला जेलमधून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्यांचा हा प्लॅन जेलर कसा उधळून लावत राहतो, यावर या चित्रपटाचे कथानक बेतलेले आहे. या चित्रपटात याशिवाय रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन, योगी बाबू यांच्या भूमिका आहेत. तसेच, मोहनलाल व जॅकी श्रॉफ यांनी छोटेसे, पण लक्षवेधी रोल केले आहेत.

रजनीकांतने या चित्रपटासाठी 110 कोटी रुपयांचे भरभक्कम मानधन घेतले असल्याचे वृत्त आहे. या दोन वर्षांतील हा रजनीकांतचा पहिलाच चित्रपट असून यासाठी 5 ऑगस्टपासूनच अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले होते. तामिळनाडू व केरळमधील बहुतांशी शो हाऊसफुल्ल झाले. यामुळे काळ्या बाजाराला देखील ऊत आला होता. काही ठिकाणी तर फर्स्ट डे, फर्स्ट शो साठी काही चाहत्यांनी एका तिकिटासाठी अगदी 5 हजार रुपये मोजल्याचेही चर्चेत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news