पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिला मनी लाँड्रिंग प्रकरणी पटियाला हाऊस कोर्टमध्ये हजर झाली होती. सुकेश चंद्रशेखर याच्या २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिनचेही नाव आहे. याआधीही ती अनेकदा कोर्टात हजर झाली आहे. यावेळी जॅकलिनने न्यायालयात हजर झाल्यानंतर सुकेश आणि तिच्या संबंधांबाबत माहिती दिली. नोरा फतेही हिने देखील सुकेशबाबत माहिती दिली आहे. इंडिया टुडेने जॅकलिनच्या वक्तव्याबाबत दिलेल्या माहितीनुसार सुकेश चंद्रशेखरच्या अडचणीत वाढ होऊ शकेल.
सुकेश चंद्रशेखरसोबतच्या नातेसंबंधाची माहिती जॅकलिनने याआधी दिली होती. यावेळी तिने (Jacqueline Fernandez) दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "सुकेशने माझ्या भावनांशी खेळून माझे जीवन नरक बनवले आहे,
तिने आज कोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार सुकेशसोबत तिचे भावनिक नाते होते. ती पुढे असेही म्हणाली की, सुकेश चंद्रशेखर तिच्या भावनांशी खेळत होता. "त्याने माझी दिशाभूल केली, माझे करिअर आणि माझे जीवन उद्ध्वस्त केले आहे. तिच्यावर विनाकारण २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खोटे आरोप केले जात आहेत." दिल्ली पोलीस आता जॅकलीन फर्नांडिसने (Jacqueline Fernandez) माहिती पुरावा म्हणून न्यायालयात सादर करणार आहेत. तिच्या या वक्तव्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे.
जॅकलिन या प्रकरणात आतापर्यंत फक्त आरोपी होती. मात्र आता तिच्या या वक्तव्यानंतर ती या प्रकरणात दिल्ली पोलिसांची साक्षीदार बनली आहे. ही बातमी जॅकलिनसाठी मोठा दिलासा देणारी आहे. एका रिपोर्ट्सनुसार, जॅकलिन फर्नांडिसचे नाव सुकेशसोबत जोडल्यानंतर तिच्याकडून दोन मोठे प्रोजेक्ट्स काढून घेण्यात आले होते.
नोरा फतेह देखील या प्रकरणामध्ये चर्चेत आली आहे. नोराने सुकेश संबंधित काही माहिती दिली आहे. ती म्हणाली की, सुकेशची इच्छा होती की नोरा त्याची गर्लफ्रेंड व्हावी. याच्या बदल्यात तिला एक कारआणि बंगला मिळेल. नोराने पुढे असे देखील म्हटले आहे की, ती यापूर्वी सुकेशला कधीच भेटली नव्हती.
हेही वाचा