गोवा विधानसभेच्या उपसभापती पदासाठी उद्या होणार मतदान

गोवा
गोवा

 पणजी ; पुढारी वृत्तसेवा : गोवा विधानसभेच्या उपसभापती पदासाठी उद्या दिनांक २२ जुलै रोजी मतदान होणार आहे. ४० आमदारांच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकारकडे २५ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यात भाजपाचे वीस आमदार आहेत.

म्हापसा मतदारसंघाचे भाजपचे युवा आमदार जोशूआ डिसोझा यांना भाजपने उपसभापती म्हणून पुढे केले आहे. तर विरोधी पक्ष कॉंग्रेसतर्फे शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आज दुपारी  वरील दोन्ही उमेदवार अर्ज भरणार असल्याचे कळते. उद्या सकाळी विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपसभापती पदासाठी मतदान होणार आहे. माजी उपसभापती सुभाष फळदेसाई यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर उपसभापतीपद रिक्त झाले होते. त्या पदासाठी उद्या मतदान होणार आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news