कुरुलकरचा कारनामा : पाकिस्तानला दिली मिसाईलची माहिती

कुरुलकरचा कारनामा : पाकिस्तानला दिली मिसाईलची माहिती
Published on
Updated on

पुणे : पाकिस्तानी ललनेच्या मोहात अडकून स्वदेशी तंत्रज्ञानातून तयार केलेल्या ब्राह्मोस, अग्नी मिसाईलसह आकाश लाँचरची सर्व गुपिते व त्यांचे तंत्रज्ञान पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या हाती 'डीआरडीओ'चा शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप मोरेश्वर कुरुलकरनेच पाठविले असल्याचे एटीएस तपासात निष्पन्न झाले आहे. दोनच दिवसांपूर्वी एटीएसने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे.
संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) दिघीतील वरिष्ठ शास्त्रज्ञ असलेल्या कुरुलकरने भारतीय संरक्षण दलाची गोपनीय माहिती शत्रुराष्ट्राच्या हाती दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर 3 मे 2023 रोजी गुन्हा दाखल करून एटीएसने अटक केली होती. अटकेनंतर जवळपास पंधरा दिवसांपासून येरवडा कारागृहात असलेला कुरुलकर तपास यंत्रणेला तपासात मदत करीत नसल्याचे तपास अधिकार्‍यांनी न्यायालयात सांगितले होते.

त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या हार्ड डिस्क, मोबाईल व संगणकात भारताने विकसित केलेल्या रॉकेट लाँचर व मिसाईलचे पीपीटी प्रेझेंटेशनसह ते कसे वापरले जाणार आहे, याची सचित्र माहिती होती. अटकेनंतर कुरुलकरने मफअगाची असे घडलेच नाहीफफ असा बनाव करीत तपास यंत्रणेची दिशाभूल केली. त्याने विकसित केलेल्या रॉकेट लाँचर व मिसाईलवर विषय संशोधन करून लष्करी सेवेत दिले आहेत. या सर्व संशोधनाची माहिती पाकिस्तानला पाठवल्याचे तपासात उघड झाले आहे.

एटीएस विभागाच्या तपास अधिकारी सुजाता तानवडे यांनी दोनच दिवसांपूर्वी कुरुलकरविरोधात दोषारोपपत्र दाखल करून त्याने केलेल्या देशद्रोही कृत्यावर शिक्कामोर्तब केले. कुरुलकरने झारादास गुप्ता नाव धारण केलेल्या पाकिस्तानी ललनेच्या मोहजाळात अडकून डीआरडीओत विकसित केलेल्या कंपोझिट हल, ब्रह्मोस लाँचर, ड्रोन, यूसीबी अग्नी मिसाईल लाँचर, मिलिटरी ब्रिजिंग सिस्टिम आणि मिलिटरी इंजिनिअरिंग इक्विपमेंट तयार करणे, डेव्हलप करणे, डिझाइन करण्याचे काम व इतर सुरक्षासंबंधित गोपनीय संवेदनशील माहिती कुरुलकरकडून हस्तगत करण्यात झारादासने यश मिळविले, असे एटीएसने आरोपपत्रात म्हटले आहे. परस्त्री आकर्षणाच्या उद्देशाने झारा हिला हवी असलेली गोपनीय व संवेदनशील माहिती अधिकार नसताना संग्रहित करून देण्याचे कृत्य कुरुलकरने केल्याचे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे

एटीएसतर्फे डॉ. कुरुलकरविरोधात दोषारोपपत्र दाखल
एटीएसतर्फे डॉ. कुरुलकरविरोधात दोषारोपपत्र विशेष दाखल केले गेले. शुक्रवारी संबंधित दोषारोपपत्राची प्रत डॉ. कुरुलकर याच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधील न्यायाधीशांसमोरील संमतीने त्याचे वकील ऋषिकेश गानू यांना दिली. या वेळी सरकारी वकील अ‍ॅड. विजय फरगडे हेदेखील एटीएसची बाजू मांडण्यासाठी उपस्थित होते. कुरुलकरच्या न्यायालयीन कोठडीत 21 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच कुरुलकरच्या व्हॉइस लेअर सायकॉलॉजिकल चाचणीकरिता पोलिसांचे लेखी म्हणणे सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

रोबोटिक उपकरण व त्याचे तंत्र धोक्यात
कुरुलकरने झारादास गुप्तासोबत व्हॉट्सअ‍ॅप मेसेज माध्यमातून सरफेस टू एअर मिसाईलबाबत व त्याच्या वापराबाबत माहिती देऊन त्याचे टेस्टिंग व ट्रायल दिले असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच ड्रोनबाबतची माहिती, त्याच्या कॅपेसिटीबाबतची माहितीदेखील दिल्याचे उघड झाले आहे. भारतीय अधिकार्‍यांना चुकीची माहिती देऊन रोबोटिक उपकरण जे शास्त्रज्ञ बनवतात त्यांची नावेही पाकिस्तानी हस्तकास देण्यात आली असल्याचेही दोषारोपपत्रात म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news